ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथे कारगिल विजय दिवस साजरा

यावल न्युज : किरण तायडे
"आपला तिरंगा फडकतो तो केवळ वाऱ्यामुळे नव्हे, तर प्रत्येक त्या शूर जवानाच्या अखेरच्या श्वासामुळे, ज्याने देशासाठी प्राण अर्पण केले."
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथे २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.

लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वतरांगांवर पाकिस्तानकडून बळकावलेली शिखरे भारताच्या शूर जवानांनी परत मिळवली. त्यांच्या शौर्याला मानवंदना म्हणून संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर ज्योती विद्या मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. जे. आर. सरोदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, "हा दिवस आपल्या देशाच्या वीर शूरवीरांच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्यांच्या पराक्रमामुळेच आज आपण सुरक्षित आहोत."

या कार्यक्रमाचे आयोजन ३१६ ट्रूप एनसीसी ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. यांच्यातर्फे करण्यात आले. आयोजनासाठी सेकंड ऑफिसर पंकज भंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास प्रा. पी. एम. इंगळे, प्रा. पी. ए. पाटील, तसेच किरण भाऊसाहेब (छात्रसैनिक) उपस्थित होते.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रसेवा व शौर्याची जाणीव निर्माण करणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने