यावल न्युज : जळगाव -
राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त मंगळवारी, १ जुलै रोजी गिरीशभाऊ महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांचा तुळशीचे रोपटे देऊन पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला.
या उपक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. रमेश वासनिक, डॉ. कपिल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. सुशांत सुपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांचा वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांच्या हस्ते तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा खास संदेश समन्वयक शिवाजी पाटील यांनी उपस्थित डॉक्टरांना वाचून दाखवला. डॉक्टरांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान, समर्पण आणि समाजासाठी त्यांचे कार्य याबद्दल मंत्री महाजन यांनी आपल्या संदेशात गौरवोद्गार व्यक्त केले.
या कार्यक्रमातून वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान करतानाच पर्यावरण जतनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.