यावल न्युज
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल भाजप मंडळाच्या वतीने यावल खरेदी विक्री संघ कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात फैजपूर येथील संजीवनी ब्लड बँक यांच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला. शिबिरात एकूण ४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यात सहभाग घेतला.
या वेळी प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हिरालाल चौधरी, यावल तालुका चिटणीस विलास चौधरी, तालुका उपाध्यक्ष उज्जैनसिंग राजपूत, तालुका अध्यक्ष सागर कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ. कुंदन फेगडे, सागर महाजन, भरत पाटील (माजी सरपंच, हिंगोणा), नितीन महाजन, बाळू फेगडे, रितेश बारी, व्यंकटेश बारी, कोमल इंगळे, पूनम पाटील, पिंटू कोळी, सागर चौधरी, अनिकेत सरोटे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन अतुल भालेराव, चेअरमन पांडुरंग सराफ, तेजस पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरामुळे यावल भाजप मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षाने जाणवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.