यावल न्युज चुंचाळे : सुपडु संदानशिव
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील प्रसिद्ध असलेले श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी आणि श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असलेले मदिरात, दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्ताने फराळाचे आयोजन करण्यात येते त्यात नुकतेच निधन झालेल्या कस्तुराबाई चैत्राम सावकारे यांच्या गंधमुक्तीचा दिवस एकादशीला येत असल्याने २१ किलो साबुदाणा फराळ करुन मदिरात कै कस्तुराबाई सावकारे यांच्या स्मुर्तीपित्यर्थ त्यांचे पती चैत्राम सावकारे आणि मुल विजय व किरण सावकारे यांच्या वतीने वाटप केला जाणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी आईचा दहाव्याचा कार्यक्रम येत असल्यामुळे सदर कार्यक्रम घरी मोजकाच करून मंदिरात फराळ वाटप करण्याचे सावकारे परिवाराने ठरविले आहे, तसेच त्याच दिवशी नाशिक येथे कै. कस्तुराबाई सावकारे यांचा दहाव्याचा, दशक्रिया विधीचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे तसेच त्यांच्या आत्म्यास चीरशांती लाभावी म्हणून त्यांचे पती आणि मुलांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
त्याच बरोबर मंदिरात सुद्धा अनेक भाविक भक्तांच्या वतीने फराळ, केळी आणि चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, सदर प्रसादाचा लाभ गावातील सहपरिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सावकारे परिवार व श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ चुंचाळे बोराळे वतीने करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमा दरम्यान मंदिरात सकाळी पाच वाजे पासून श्री विठ्ठल रुक्माईची व बाबांची समाधी स्नान पूजाअर्चा व होम पूजन होणार आहे, तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा व फराळ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.