दहिगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले विठू माऊली चे दर्शन अकरा क्विंटल साबुदाणा फराळ व 10000 लाडू वाटप

यावल न्युज : जिवन चौधरी

 यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रति पंढरपूर मानले गेलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने यात्रा उत्सव पार पडला साबुदाणा फराळ दहा हजार राजगरा लाडू चहा तसेच रेड क्रॉस ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
 विठ्ठल रुक्माई चे दर्शन आमदार अमोल जावळे तहसीलदार मोहनमाला नाझरीकर यांनी घेऊन नागरिकांसाठी प्रार्थना केली दहिगाव येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात सकाळी पाच वाजता नवविवाहित पाच जोडप्यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली दहा वाजेच्या दरम्यान फराळ वाटपास प्रारंभ झाला विठू माऊलीच्या दर्शनासाठी शिरसाड साखळी चिंचोली, चुंचाळे आदी गावांमधून पायी दिंडी सोहळे आलेत दिवसभर मंदिरात भावगीते व भजने गायण करण्यात आले 
 सायंकाळी पाच वाजता मंदिरापासून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला या दिंडी सोहळ्यात बहुसंख्य भाविकांची गर्दी होती विठ्ठल नामाच्या गजरात सारे दहिगाव दुमदुमून गेले होते यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील सचिव कैलास पाटील उपसरपंच देविदास पाटील प्रमोद चौधरी यांचे सह फराळ बनवण्यासाठी परिश्रम घेणारे भाविक यांचा सहभाग होता 

दरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझरीकर आमदार अमोल जावळे यांनी विठू माऊली चे दर्शन घेत यावल तालुक्यातील माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त कर अशी मागणी पांडुरंगाकडे केली व शेतकरी नागरिक सुख समृद्धीने राहोत अशी प्रार्थना केली
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने