यावल न्युज
हिंगोणा (ता. यावल) – आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री नूतन गणेश मंडळ, हिंगोणा आणि सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समिती, हिंगोणा यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी मोफत फराळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमात मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. विठ्ठलनामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात भक्तांना फराळाचे वाटप करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट संयोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.