Hingona Road Accident हिंगोणा जवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक – दोघे गंभीर जखमी

यावल न्युज
 यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ रविवारी संध्याकाळी सुमारे ६:३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अपघातात अर्शद शेख सुपडू (रा. मिल्लत नगर, फैजपूर) हे एमएच १९ डीएल १३०८ या क्रमांकाच्या बजाज प्लेटिना मोटारसायकलने यावल कडून फैजपूरच्या दिशेने जात होते. त्याच वेळी शिरसाड साखळी (ता. यावल) येथील पुरुषोत्तम रामभाऊ साळी हे एमएच १९ बीपी ८९४२ क्रमांकाच्या सीबीझेड एक्सटी मोटारसायकलने फैजपूरहून यावलच्या दिशेने येत होते. हिंगोणा जवळ एका वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली व दोघेही वाहन चालक जखमी झाले
अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही वाहनचालक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ 112 या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी देविदास सूरदास, विकास सोनवणे, योगेश दुसाने व अरुण नमाईते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले.

या अपघाताची नोंद फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने