आ.अमोल जावळे यांच्या उपस्थितीत डोंगरकठोरा येथे महाराजस्व समाधान शिबीरात ८८८ नागरिकांना थेट सेवा

यावल न्युज
यावल तालुक्यातील महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक १ जून २०२५ रोजी डोंगरकठोरा येथील श्री खंडेराव मंदिर ट्रस्ट सभागृहात यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात विविध विभागांमार्फत एकूण ८८८ लाभार्थ्यांना थेट सेवा प्रदान करण्यात आल्या.




महसूल विभाग:

जिवंत ७/१२ – १५२

ई-हक्क नोंदणी – १२८

दुरुस्ती – १९


मतदार यादी अद्ययावतीकरण:

फॉर्म ६ – २२

फॉर्म ७ – १३

फॉर्म ८ – ४


संजय गांधी योजना (DBT लाभार्थी) – १५२

आरोग्य तपासणी – ५४

शिधापत्रिका लाभ – ८४

सेतू केंद्राद्वारे विविध दाखले – १८३
(उत्पन्न – ६६, जातीचे – ७२, वय/रहिवास – ४५)

लेक लाडकी, जननी सुरक्षा, ICDS योजना – ४३

या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते.
शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले. त्यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला आणि "शासन आपल्या दारी" ही संकल्पना वास्तवात उतरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले.

उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनीही शिबिरात हजेरी लावून महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करत, नागरिकाभिमुख सेवा देण्याचे महत्व अधोरेखित केले.


आमदार अमोल जावळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, "अंत्योदय हीच खरी लोकसेवेची दिशा आहे. प्रशासनाने शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकतेने सेवा पोहोचवाव्यात, हीच जनतेची अपेक्षा आहे," असे उद्गार काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई यांनी केले व आभारप्रदर्शन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले.
ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा शिबिरांची सातत्याने गरज असल्याचे मत नोंदवले. 

या शिबिरास माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, श्याम महाजन, भरत पाटील, यदु पाटील, पंकज चौधरी, शरद कोळी, योगेश भंगाळे, रुपेश पाटील, डिगंबर खडसे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने