श्री गणेश अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...

यावल न्युज : किरण तायडे
 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांप्रमाणे श्री गणेश अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव खेमचंद्र रामदास धांडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन, यावल चे अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना "स्वदेशी विचार व संकल्पना" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सुमारे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेद्वारे जो स्वदेशी विचार रुजविला, तो आजही प्रेरणादायी आहे. युवकांनी स्वदेशी विचार आत्मसात करून भारताला महासत्ता बनविण्यात योगदान द्यावे.”

खेमचंद्र धांडे यांनीही विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, “आपण स्वतः उद्योग सुरू करून आपल्या समाजाचा, गावाचा विकास साधू शकतो.”

संस्थेचे प्राचार्य तुषार धांडे सर यांनी शासनाच्या पंचसुत्री कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध विषयांवर प्रोजेक्ट तयार केले होते. त्यात –


सौर ऊर्जेपासून विजेची निर्मिती

सेन्सर आधारित अॅक्वा सिस्टिम

शेतात वीज निर्मितीसाठी आटोपंप

जेसीबी लाइटिंग कंट्रोलर अशा नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात आल्या.



या स्पर्धेत –
🥇 प्रथम क्रमांक: अमन तडवी
🥈 द्वितीय क्रमांक: मयूर बारी व सूरज जयकर
🥉 तृतीय क्रमांक: गणेश नेमाडे व भूषण कोळी
यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रमुख अतिथी ॲड. देवकांत पाटील आणि अध्यक्ष खेमचंद्र धांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमात संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, व इतर स्टाफ सदस्य उपस्थित होते. यामध्ये योगेश भगवान धांडे सर, योगेश ठाकूर धांडे, हिमश्री बऱ्हाटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेकडे नेणाऱ्या सर्व आयोजकांचे व सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने