यावल तालुक्यात काँग्रेसची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर ; ग्रामीण ब्लॉकच्या अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड

यावल न्युज
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणारे यावल पंचायत समिती मधील कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्य करणारे माजी गटनेते शेखर सोपान पाटील यांची भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने यावल तालुका ग्रामीण ब्लॉकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .              
 शेखर पाटील हे राजकारणातील एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी लागणारी मदत ते स्वतः कार्यालयात जाऊन सोडवत नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी तरुणांकडे देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे                    

 शेखर सोपान पाटील यांच्या निवडीचे रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी,एन एस यु आय चे धंनजय चौधरी,पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान , पंचायत समितीचे माजी उपसभापती लिलाधर चौधरी, सैय्यद जावेद अली, मारूळचे सरपंच सैय्यद असद अली , सरपंच परिषदचे संदीप सोनवणे, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, हिंगोणा माजी सरपंच महेश राणे.डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी, कॉंग्रेस कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे,अभय महाजन,हाजी गफ्फार शाह,काँग्रेस कमेटीचे नुतन यावल शहराध्यक्ष हकीम शेख याकूब,अशपाक शाह, धिरज कुरकुरे, अल्ताफ तडवी,मोइन पटेल यांच्यासह आदिंनी त्यांचे स्वागत केले आहे .
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने