यावल न्यूज
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची महत्वपूर्ण बैठक नवनियुक्त शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघ सभागृह, यावल येथे पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, युवासेना पदाधिकारी चंद्रकांत शर्मा यांचा शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गुलाबराव वाघ यांनी पक्ष बळकटीचा ध्यास घेत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला की, "प्रत्येक शिवसैनिकाने जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि प्रसंगी आंदोलन करून प्रश्न मार्गी लावावेत. जनतेच्या समस्यांबाबत गप्प न बसता, रस्त्यावर उतरून त्या सोडवण्याचा शिवसेनेचा लढवय्या वारसा जपावा."
पक्षवाढीसाठी एकजुटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की पक्षाची ताकद संघटनात असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची सक्रियता हेच निवडणुकीतील यशाचे मुख्य सूत्र आहे.
बैठकीत उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
उपजिल्हा प्रमुख गोपाळ चौधरी, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, उपतालुका प्रमुख शरद कोळी, डी. एम. पाटील, किरण साळुंखे, संतोष धोबी, पप्पू जोशी, शकील पटेल, आदिवासी सेनेचे हुसेन तडवी, दगडू पाटील (शिवाजी नगर), निलेश पराशर, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, नितीन इंगळे, हमीद पटेल, प्रमोद तळेले, अजहर खाटीक, इमियास शेख, कपिल शेख मन्यार, पिंटू कुंभार, विजू कुंभार, सुरेश कुंभार, योगेश राजपूत पाटील, योगेश चौधरी, प्रल्हाद बारी, पंकज बारी, कडू पाटील, प्रवीण लोणारी, चेतन इंगळे (न्हावी), विलास चौधरी, प्रकाश वाघ, सारंग बेहेडे, संतोष वाघ, आर. के. चौधरी, संजय मोतीराम पाटील (विरावली), विजय कवडीवाले आदी.
या बैठकीस शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले.
ही बैठक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना संघटित ताकदीनिशी उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसले.