कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांसाठी "ना नफा ना तोटा" तत्वावर ताडपत्री वितरण

यावल न्यूज
रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शेतकरी हितचिंतक स्व. हरिभाऊ माधव जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शेतकरी बांधवांसाठी "ना नफा, ना तोटा" तत्वावर ताडपत्री वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते या ताडपत्रीचे वितरण होणार आहे.

ताडपत्रीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:


साईज: 20 x 30 फूट

जीएसएम: 250

रंग: काळा

मटेरियल: HDPE

MRP: ₹5100

योजना किंमत: ₹1800



योजनेच्या अटी व शर्ती:


ताडपत्री मर्यादित असल्याने "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" या तत्वावर वितरण करण्यात येईल.

ही योजना फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे. यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह शेतकरी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परहस्ते वितरण मान्य नाही.

वितरणापूर्वी KYC प्रक्रिया अनिवार्य आहे.

मुद्दल रक्कम फक्त रोखीने स्वीकारली जाणार आहे.



या योजनेचा लाभ घेण्याची इच्छुक शेतकरी बांधवांना दिनांक 16 जून 2025 रोजी, दुपारी 12 वाजता, कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती राकेश फेगडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा उपक्रम स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कृषीप्रेमी कार्याची आठवण करून देणारा आणि शेतकऱ्यांप्रती असलेली कृतज्ञतेची जाणीव अधोरेखित करणारा ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने