यावल न्युज
रावेर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी संघटनेची बैठक काल दिनांक १३ जून २०२५ रोजी जुने तहसील कार्यालय, रावेर येथे पार पडली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली असून विवरा बु येथील ग्राम महसुल अधिकारी भारत वानखेडे यांची अध्यक्षपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर तहसीलचे नायब तहसीलदार आर. डी. पाटील होते. तसेच जळगाव जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अनंता खवले, खानापूर मंडळ अधिकारी यासीन तडवी, पाल मंडळ अधिकारी निलेश धांडे, सावदा मंडळ अधिकारी एफ. एस. खान यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.
या निवडीत उपाध्यक्षपदी अंजुम तडवी, सचिवपदी गुणवंत बारेला, सहसचिव पदी रवि शिंगणे यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. तर खजिनदार म्हणून नागसेन इंगळे आणि संघटक म्हणून दीपक खैरनार यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबाबत सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघटनेच्या पुढील कार्यकाळात महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक वृद्धी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.