शेतकऱ्यांसाठी नॉन लिंकिंग युरिया व डीएपी खत उपलब्ध करून द्यावे – आमदार अमोल जावळेंची कृषी मंत्र्यांकडे मागणी

यावल न्युज

सध्या जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये, विशेषतः रावेर मतदारसंघात, शेतकऱ्यांना युरिया व डीएपी या अत्यावश्यक खतांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. लिंकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसल्याने खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर, रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.माणिकरावजी कोकाटे यांना निवेदन देत लिंकिंग शिवाय (Non-Linking) युरिया व डीएपी खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि खत वितरणात लवचिकता ठेवावी, अशी आग्रही भूमिका आमदार जावळे यांनी मांडली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने