यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना

यावल न्युज
 यावल तालुक्यातील सावखेडा सिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रविवारी (दि. 29 जून) आले होते. दुपारी साडेचार वाजता ते धरणावर पोहोचले. सायंकाळी पाच वाजता आंघोळीसाठी काही तरुण धरणाच्या पाण्यात उतरले असता, यातील जतीन अतुल वार्डे (वय 18) हा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडला
त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही पोहता न आल्यामुळे मदत करता आली नाही. घटनेची माहिती पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी तात्काळ यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक रवाना केले. विजय पाचपोळे, हवालदार हर्षद गवळी, हवालदार मुकेश पाटील, पोलीस नाईक अमित तडवी, संतोष पाटील यांनी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत धरणात शोध घेतला, मात्र तरुणाचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली असून सोमवारी (30 जून) सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. निंबादेवी धरण हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक तरुण येथे मौजमजा करण्यासाठी येत असतात.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने