यावल न्युज
खरीप हंगाम 2025 करिता यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मृग बहार फळपिक हवामान आधारित विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी केले आहे.
सदर योजना 30 जून 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत लागू राहणार असून, यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू, मोसंबी, संत्रा, डाळिंब व चिकू या फळपिकांचा विमा उतरवता येणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जाऊन योजनेची माहिती घेऊन विहित मुदतीत आपल्या फळपिकांचा विमा उतरवावा. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून बचाव करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
कृषी विभागामार्फत योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी जनजागृती केली जात असून, योग्य कागदपत्रांसह योजनेत नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.