वादळी वाऱ्याचा कहर – डोंगर कठोरा येथे झाड कोसळून बैलाचे कंबरडे मोडले, यावल तालुक्यात केळी पिकांचे मोठे नुकसान

यावल न्युज
 यावल तालुक्यात आज शुक्रवार, दि. ६ जून रोजी सायंकाळी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने परिसरात मोठा हाहाकार माजवला. विशेषतः डोंगर कठोरा गावात या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या शेतातील खळ्यात बांधलेल्या बैलावर लिंबाचे मोठे झाड उन्मळून पडले. या अपघातात बैलाचे कंबरडे मोडले असून, बैल गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे हा बैल सरपंच तडवी यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच ४८ हजार रुपयांना खरेदी करून आणला होता.

या घटनेमुळे ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या काळात मोठा आर्थिक व श्रमदगडी फटका बसला आहे. घटनास्थळी तलाठी गजानन पाटील आणि पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळे डोंगर कठोरा व आसपासच्या भागातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक वाऱ्यामुळे आडवे झाले असून त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने