भुसावळ हायवे जवळ भीषण अपघात – शिवसेना विभागप्रमुख अवी भगत यांच्या तत्परतेने जखमी रुग्णालयात दाखल

भुसावळ :
आज सकाळी सुमारे ९ वाजता भुसावळ जवळील नॅशनल हायवे क्र. ६ वरील रेल्वे पुलाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाला असून तो रस्त्यावर निपचित पडलेला होता. विशेष म्हणजे घटनास्थळी हायवे कर्मचारी उपस्थित असतानाही कुठल्याही प्रकारची रुग्णवाहिनी घटनास्थळी पोहोचली नाही आणि जखमीस तातडीची मदत देण्यात आलेली नव्हती.
ही बाब शिवसेना शिंदे गटाचे भुसावळ विभागप्रमुख अवी भगत यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त मोटारसायकल (क्र. एम.एच. १९ डीके ०११४) बाजूला करून रुग्णवाहिनीची तातडीने व्यवस्था केली. गंभीर जखमीस गोदावरी रुग्णालयात दाखल करून त्याच्या जीव वाचवण्यासाठी मदतीचे प्रयत्न केले.

या प्रसंगी अवी भगत यांनी घटनास्थळी उपस्थित हायवे कर्मचाऱ्यांना खरमरीत समज दिली. "ज्यांच्या जबाबदारीत रुग्णांसाठी तातडीने मदत उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे, त्यांनीच जर अशा प्रकारे हलगर्जीपणा केला, तर यापुढे शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल," असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकारामुळे हायवेवरील आपत्कालीन व्यवस्थेची सद्यस्थिती आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने