लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे वृक्षारोपण

यावल न्युज
 लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमाच्या अंतर्गत ९७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ‘हिरवा सातपुडा’ या स्व. मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला समर्पित असलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.




निसर्ग व वन्यजीवांचे संवर्धन आणि आदिवासी जीवन-संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सामाजिक सलोखा, समरसता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये डॉ. राजेंद्र पाटील, लिलाधर चौधरी, मा. कुमार चौधरी, किशोर महाजन, शेखर पाटील, मा. हमीद तडवी, कामिल शेठ, राजू सवरने, संजू जमादार, योगेश पाटील, उस्मान तडवी, महेश महाजन, सुधाकर झोपे, मो. हकीम मो. याकुब, सुनिल फिरके, नईम शेख, अनिल जंजाळे, रतन बारेला, किशोर चौधरी, सरफराज तडवी, लियाकत जमादार, लक्ष्मण मोपारी, संजय पवार, बबलू तडवी, संजय भालेराव, महेबूब जमादार, देवीदास हडपे, यशवंत महाजन, भरत चौधरी, डिगंबर चौधरी, ललित चौधरी, अनिल तडवी, राजू चौधरी, अनिल महाजन, सुरज पाटील, राहुल पाटील, विजय कोळी, व्ही.आर. पाटील, आर.एल. चौधरी, उत्तम चव्हाण, रमेश झांबरे, रवींद्र कुमावत, नितीन भंगाळे, जितेंद्र पाटील, गोविंदा गुरुजी, अतुल महाजन, अतुल मालखेडे, सुनील सपकाळे, विवेक महाजन, दिनेश पाटील, दिलीप चौधरी यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात यावल वन्यजीव अभयारण्य व स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. ‘मधुस्नेह संस्था परिवार’ व ‘लोकसेवक प्रतिष्ठान’ यांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. सर्व सहभागी संस्थांचे व व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपले संपूर्ण आयुष्य भेदभावमुक्त, समरस समाजाच्या उभारणीसाठी अर्पण केले होते. त्यांचे विचार व कार्य भावी पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने