हिंगोणा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

यावल न्युज

तालुक्यातील हिंगोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल मंडळच्या वतीने प्रभात विद्यालय हिंगोणा तालुका यावल येथे योग कार्यक्रम सम्पन्न झाला.यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.योग ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी असून मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अंत्यत उपयुक्त आहे.
या कार्यक्रमात भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष यांच्या सोबत,डॉ.कुंदन फेगडे,पी.एस.सोनवणे,शाळेचे चेअरमन रवींद्र हरी पाटील,पितांबर वायकोळे,नरहर गुळवे,सरपंच सारिका सावळे, मुख्याध्यापक मनोज गाजरे,संजीव चौधरी,सचिव अशोक फालक,मनोज वायकोळे,भरत पाटील,भुषण फेगडे,मुकेश कोळी,पराग सराफ,विष्णु महाजन,जयेश चौधरी,प्रणव राजपूत,योग प्रशिक्षक योगेश कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने