यावल नगर परिषदेला पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी शिवसेना (शिंदे गट) ची मागणी

यावल न्युज
 यावल नगर परिषदेमध्ये सध्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचा तुटवडा जाणवत असून, नगरपालिकेला पूर्णवेळ, कायमस्वरूपी अधिकारी वर्ग तात्काळ मिळावा, अशी ठाम मागणी शिवसेना (शिंदे गट) यावल तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर तात्काळ नवीन, पूर्णवेळ आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा अभियंता नेमणूक करण्यात यावी. तसेच, सत्यम पाटील यांना यावल नगर परिषदेत पुन्हा कुठल्याही पदावर नेमण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सत्यम पाटील यांच्या कार्यपद्धतीविरोधात यावल शहरातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. यापूर्वी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारीसह पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे भविष्यात जर त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती झाली, तर त्याविरोधात शिवसेना आणि युवासेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनामार्फत देण्यात आला आहे.

या निवेदनप्रसंगी शिवसेना युवा तालुकाध्यक्ष अजय तायडे, शिवसेना उपजिल्हा संघटक नितीन सोनार, यावल शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे, व राजू सपकाळे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने