फैजपूर येथे 42 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

यावल न्युज
 
Sexual assault on Faizpur woman फैजपूर शहरातील एका भागात राहणाऱ्या 42 वर्षीय विवाहित महिलेसोबत दीपक प्रभाकर तायडे (वय 32, रा. गेंदालाल मिल, जळगाव) या तरुणाने ओळख वाढवून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना 20 जून 2024 ते 17 मार्च 2025 या कालावधीत घडली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो काढून, त्याचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले. या फोटोचा वापर करून धमकी देत त्याने पुन्हा-पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने सदर फोटो इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करून पीडितेची समाजात बदनामी केली.

दिनांक 2 जून 2025 रोजी सोमवारी रात्री 11 वाजून 39 मिनिटांनी फैजपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दीपक तायडे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने