ऑल इंडिया पँथर सेनेच्या जळगांव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र वानखेडे.

यावल न्युज : सुपडू संदानशिव 

संपूर्ण महाराष्ट्रात बहू चर्चित असलेल्या आणि आपल्या संघर्षाने संपूर्ण भारतात शोषित पीडित समाज्याच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करून आपली छबी उमटवलेल्या ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पारोळा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वानखेडे यांची ऑल इंडिया पँथर सेना या संघटनेच्या जळगांव जिल्हा (पश्चिम) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,


येणाऱ्या काळात जिल्ह्याभरात संघटनेची बांधणी करत संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या 
मदती साठी नेहमी तत्पर राहणार असल्याचे जितेंद्र वानखेडे यांनी सांगितले.तर वानखेडे यांनी अगोदर सुद्धा अनेक सामाजिक संघटनेत कामं केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने