यावल न्युज
रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शेतकरीहितैषी नेते स्व. हरिभाऊ माधव जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी कार्य स्मरून, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ना नफा, ना तोटा तत्वावर ताडपत्री वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या उपक्रमात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या ताडपत्रीचा तपशील पुढीलप्रमाणे होता –
साईज: २० x ३० फूट
जीएसएम: २५०
रंग: काळा
मटेरियल: HDPE
MRP किंमत: ₹५१००
योजना किंमत: ₹१८००
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक २१ जून २०२५ पर्यंत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत आवश्यक कागदपत्रांसह – सातबारा उतारा व आधार कार्ड – स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अमोल जावळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी व शरद महाजन, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, हर्षल पाटील, शिवसेना (शिंदे गट)चे मुन्ना पाटील, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, यावल तालुका खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी आणि महायुतीचे नेते सहभागी होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी राबवलेला हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला आहे.