यावल न्युज
"शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नुकतेच श्री खंडोबा वाडी देवस्थान सभागृह, फैजपूर येथे संपन्न झाले. यावेळी मा. आमदार श्री अमोल हरिभाऊ जावळे यांच्या शुभहस्ते विविध योजनांचे थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्री बबन काकडे, तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर, तसेच महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, निवडणूक व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरातील ठळक लाभ देण्यात आले
महसूल विभागातून:
जिवंत 7/12 नोंदणी – 72 प्रकरणे
ई-हक्क नोंदणी – 35 प्रकरणे
म.ज.म.अ. 155 दुरुस्ती – 12 प्रकरणे
मतदार यादी अद्ययावतीकरण:
नवीन मतदार नोंदणी (फॉर्म 6) – 24
मयत नाव वगळणे (फॉर्म 7) – 09
नाव दुरुस्ती (फॉर्म 8) – 06
महत्वाच्या योजना व सेवा लाभ:
संजय गांधी निराधार योजना (DBT) – 216
आरोग्य तपासणी शिबिर – 54
कृषी विभाग सेवा – 67
शिधापत्रिका लाभ – 27
सेतू केंद्रामार्फत:
उत्पन्न प्रमाणपत्र – 32
जात प्रमाणपत्र – 26
वय, अधिवास व रहिवास – 12
इतर योजनांतर्गत:
जननी सुरक्षा योजना – 33
लेक लाडकी योजना – 07
ICDS सेवा – 08
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप – 34
जमिन आरोग्य पत्रिका – 07
या शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधान व शासनाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे