यावल शिवसेनेमार्फत आठवडे बाजारासाठी शाश्वत व्यवस्था करण्याची मागणी

यावल न्युज
शिवसेना उपजिल्हा संघटक (रावेर लोकसभा क्षेत्र) नितिन सोनार यांनी यावल शहरातील भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावल नगरपरिषदेला निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आठवडे बाजारामध्ये सुसज्ज व्यवस्था मिळत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी व इतर नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे व्यापार्‍यांना व ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

आठवडे बाजारात भाजी पाला विकण्यासाठी बसण्यासाठी  ओटे केलेले आहे परंतु ते तुटलेली असल्याने त्याचा वापर होत नाही त्यामुळे ते ओटे देखील बांधण्यात यावे

तसेच यावल नगरपरिषद मधील सर्वसामान्य नागरिकांनी वारंवार अशा सुविधा पुरवण्याची मागणी केली असूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. यामुळे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांचे हाल होत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.

शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे की, आठवडे बाजारासाठी सुयोग्य जागी कायमस्वरूपी बाजारासाठी मार्केट उभारण्यात यावे, जेणेकरून भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांना सुसज्ज जागा मिळेल आणि त्यांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही. यामुळे शहरातील रहदारीचा प्रश्नही सुटेल व बाजार व्यवस्थितपणे पार पडेल.

या निवेदनावर तातडीने कारवाई करून व्यापाऱ्यांना व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नितीन सोनार व शिवसेना शहर अध्यक्ष विवेक अडकमोल केली आहे.
त्यावेळी निवेदन देत असताना शिवसेना तालुकाध्यक्ष राजूभाऊ काठोके युवा सेना तालुकाध्यक्ष अजय तायडे शिवसेना उपशहराध्यक्ष चेतन सपकाळे शिवसेना उपशहर अध्यक्ष राजू सपकाळे किशोर कपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने