महर्षी वाल्मिक प्रवेशद्वार उभारणीसाठी सांगवी बु येथे आमरण उपोषणास सुरुवात ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतरही प्रवेशद्वाराला विलंब

यावल न्युज

यावल तालुक्यातील सांगवी बु येथे महर्षी वाल्मिक प्रवेशद्वार उभारणीच्या मागणीसाठी आज मंगळवार, दिनांक १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पासून रवींद्र रामभाऊ कोळी (रा. सांगवी बु) या युवकाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सदर प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सांगवी बु च्या सरपंच व सदस्यांनी तोंडी स्वरूपात महर्षी वाल्मिक प्रवेशद्वारासाठी ठराविक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बराच कालावधी उलटून गेला तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे तसेच ग्रामसेवक व सरपंच या ठिकाणी प्रवेशद्वार बांधण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणासंदर्भात गावातील एका अर्जदार आसिफ इस्माईल मन्यार यांनी या प्रवेशद्वारास हरकत घेत अर्ज सादर केला असून त्या अर्जातील सह्यांची पडताळणी करून चौकशी करण्यात यावी आणि तत्काळ प्रवेशद्वार उभारण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनस्थळी रवींद्र कोळी यांच्यासोबत शरद कोळी, दगळू कोळी, दिपक कोळी, विशाल कोळी, सचिन कोळी, करण कोळी, आकाश कोळी, प्रकाश कोळी, रघुनाथ कोळी, विकास कोळी, धिरज कोळी, कुंदन कोळी, भरत कोळी, योगेश कोळी, कोमल कोळी आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते. गावातील जनतेचे या आंदोलनाकडे लक्ष लागले असून प्रशासन व ग्रामपंचायतीकडून पुढील काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने