यावल तालुक्यात राजकीय भूकंपाचे भाकीत खरे ठरले! माजी जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

यावल न्यूज : हर्षल आंबेकर

यावल न्यूजने दिनांक 15 जून रोजी "यावल तालुक्यात राजकीय भूकंपाची शक्यता" असा मथळा देत पक्षांतराचे भाकीत केले होते, ते आज खरे ठरले आहे. यावल तालुक्यातील ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी आज दिनांक 17 जून रोजी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर सोनवणे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार बसले असून, आगामी निवडणुकांवर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सोनवणे हे तालुक्यात प्रभावशाली नेतृत्व मानले जात असून त्यांचा भाजप प्रवेश हा तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. त्यांच्या सोबत अनेक ग्रामपातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपची ताकद वाढली आहे.

त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील, शेतकी संघाचे अमोल भिरूड, सरपंच संघटनेचे प्रमुख संदीप सोनवणे, रमजान तडवी, अनिल पाटील, पुंडलीक सावळे, आरती पाटील, मुबारक तडवी, योगेश कोळी, संदीप पाटील, मिनाक्षी पाटील, लताताई पाटील, विनोद कोळी, प्रमोद सोनवणे आणि प्रवीण सोनवणे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी प्रवेश केला आहे 

यावल न्यूजने वर्तवलेले अंदाज अचूक ठरवत यावल तालुक्याच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडून आली आहे. आता पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने