यावल येथे शिवसेना शिंदे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा !

यावल न्युज

आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे यांनी यावल येथे भेट देऊन पदधिकाऱ्यांना संघटन मजबुत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष पवन भोळे यांनी आज दि.२२ जून रविवार रोजी भेट देवुन पक्ष संघटन वाढीसह विविध सामाजिक व राजकीय पार्श्वभुमीवर तालुक्याची माहिती जाणुन घेतली व आगामी काळात होवू घातलेल्या नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत या बैठकीत औपचारिक चर्चा करण्यात आली.

यावेळी युवा सेना यावल तालुका प्रमुख अजय तायडे यांनी शिवसेना युवकचे जिल्हाप्रमुख पवन भोळे यांचे स्वागत केले.दरम्यानआगामी निवडणुका संदर्भात बैठक आणि चर्चा झाली आणि शिवसेनेची व युवा सेनेची ताकद यावल शहर आणि तालुक्यामध्ये अधिक भक्कम करावी,आपला पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट हा ओळखला जातो याची ताकद अजून वाढवावी जास्तीत जास्त युवकांनी पक्षात प्रवेश करावा यासाठी आपण प्रयत्न करावे अशा सुचना या बैठकीत देण्यात आल्या.

सदरील बैठकीला शिवसेना यावल तालुकाध्यक्ष राजू काठोके,शिवसेना उपशहराध्यक्ष चेतन सपकाळे,शिवसेना उप शहराध्यक्ष राजू सपकाळे,शाखाध्यक्ष नाना महाजन,किशोर कपले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने