यावल न्युज : किरण तायडे
चितोडा गावात पावसाचे व घरगुती सांडपाणी नाल्यांमध्ये साचल्यामुळे दुर्गंधी पसरली होती तसेच आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या या संकटाची तात्काळ दखल घेत सरपंच अरुण पाटील यांनी ग्रामनिधीच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामास सुरुवात केली.
नाल्यांमधील साचलेले घाण पाणी व गाळ यामुळे गावात अस्वच्छता आणि रोगराईचे वातावरण तयार झाले होते. या पार्श्वभूमीवर सरपंच यांच्या पुढाकाराने जेसीबी मशीन लावून नालेसफाई केली जात आहे. ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. तळले, उपसरपंच राजू कुरकुरे, चंद्रकांत जंगले, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना तालुकाप्रमुख कडू पाटील यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे गावात स्वच्छता व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी या तत्परतेबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात साचलेले पाणी व दुर्गंधीमुळे होणाऱ्या आजारांना अटकाव मिळणार आहे.