आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ. कुंदन दादा फेगडे मित्र परिवाराकडून रुग्णांना फळवाटप

यावल न्युज

रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने आज दिनांक १८ जून रोजी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. कुंदन दादा फेगडे मित्र परिवाराच्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
या उपक्रमात रुग्णांना आरोग्यदायी फळे वितरित करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास ह. भ. प. अंकुशजी महाराज मनवेलकर, उमेश फेगडे, डॉ. जागृती फेगडे, श्री. हेमराज फेगडे, श्री. संजय फिरके, भुषण फेगडे, डॉ. सुनिल पाटील, राजु फालक, नितीन बारी, रितेश बारी, व्यंकटेश बारी, 
 स्नेहल फिरके, कोमल इंगळे, अजय गुजर, उज्वल कानडे, सागर चौधरी, अनिकेत सोरटे, मनोज बारी, दिपक फेगडे आदींसह मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आमदार जावळे यांच्या कार्यशैलीचे अनुकरण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने