यावल न्युज
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत इ. १ ली ते इ. १० वी पर्यंतच्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण यशस्वीरीत्या पार पडले आहे. दिनांक २ जून २०२५ पासून सुरु झालेल्या या मोहीमेअंतर्गत ९ जून २०२५ रोजी १००% शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हाती पुस्तकं मिळणार
या वर्षी चे विशेष वैशिष्ट म्हणजे शाळा सुरु होण्याच्या एक आठवडा आधीच पाठ्यपुस्तकांचे वितरण पार पाडण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशीपासून अभ्यासक्रम सुरळीत राबवता येणार असून शैक्षणिक सुरुवात सुसंगत होणार आहे.
पुस्तक वितरणाचा आढावा:
नगरपालिका क्षेत्रातील शाळा: एकूण २ शाळांमध्ये पुस्तक वितरण पूर्ण.
जिल्हा परिषद शाळा: एकूण १४० शाळांमध्ये ११४ मराठी माध्यमाच्या शाळा व २६ उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण.
खाजगी अनुदानित शाळा: प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण ७१ शाळांमध्ये ५९ मराठी व १२ उर्दू माध्यमाच्या शाळांना पुस्तकांचे वाटप पूर्ण.
शासकीय आश्रमशाळा: एकूण ३ शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण.
यावल तालुक्यातील (1,61,743) पेक्षा जास्त पाठ्यपुस्तकांचे यशस्वी वाटप पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सकारात्मक भर पडणार आहे.