यावल न्युज
यावल तालुका तलाठी संघटनेची बैठक जुने तहसील कार्यालयातील इमारतीमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असलेले फैजपूरचे मंडळ अधिकारी एम. एच. तडवी हे वयोमानानुसार निवृत्त झाले असून, माजी उपाध्यक्ष भारत वानखेडे यांची बदली झाल्यामुळे रिक्त झाली होती त्यामुळे ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवडीत बामणोद मंडळ अधिकारी दीपक गवई यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी डोंगरकठोरा येथील ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. यावेळी संघटनेचे सचिव म्हणून टाकरखेडा येथील ग्राम महसूल अधिकारी तेजस पाटील यांना पुन्हा एकदा कायम ठेवण्यात आले.
या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ग्राम महसूल अधिकारी हिंगोणा संदीप गोसावी यांनी प्रस्ताव मांडला होता. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.