यावल न्युज हर्षल आंबेकर
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सावखेडे सिम येथे सुरू असलेल्या कॅम्पची प्रत्यक्ष पाहणी केली. लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन योग्य प्रकारे पार पडत असल्याची खात्री त्यांनी घेतली.
आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी कॅम्प महा डीबीटी आधार व्हेरिफिकेशनचा पहिला टप्पा सावखेडे सिम मंडळात सुरू करण्यात आला आहे. या कॅम्पला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तालुक्यात विविध ठिकाणी असे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सावखेडे सिम येथे सुरू असलेल्या कॅम्पची प्रत्यक्ष पाहणी केली. लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन योग्य प्रकारे पार पडत असल्याची खात्री त्यांनी घेतली.
महसूल विभागातर्फे तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. आधार व अन्य आवश्यक कागदपत्रांसह लाभार्थ्यांनी या कॅम्पमध्ये उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ग्राममहसुल अधिकारी, मंडळ अधिकारी . ग्राम महसुल सेवक यांच्या सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. संजय गांधी योजनेच्या लाभासाठी आधार व्हेरिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.