Yawal News यावल तालुक्यात वादळीवाऱ्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यांना सुरुवात .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची त्वरीत अमलबजावणी

यावल न्युज 
तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व काही गावांमध्ये  नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त असुन, दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशावरून महसुल प्रशासना याची तात्काळ दखल घेत  नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे .                




दरम्यान काल दिनांक ६ मे रोजी यावल तालुक्यात विविध गावांमध्ये अचानक आलेल्या वादळी वारा आणी अवकाळी पाऊसामुळे केळी पिकांचे व काही ठीकाणी रहीवाशी घरांचे नुकसान झाले असुन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थित आज सकाळच्या सुमारास यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या पथकाने डांभुर्णी तालुका यावल या गाव शिवारात काल वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे  नुकसान पाहणीला सुरुवात केली आहे.                                   

यावेळी डांभुर्णी गावाच्या लोकनियुक्त सरपंच कल्पनाबाई बावीस्कर,शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते, यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ तुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्यात. या अवेळी आलेल्या वादळी वारा आणी पाऊसामुळे तालुक्यात ईतर ठीकाणी देखील मोठे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले असुन, त्यांचे ही पंचनामे व्हावे अशी अपेक्षा शेतकरी व नागरीक व्यक्त करीत आहे .
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने