Yawal Tahsil News यावल तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी शिबिरे; ७ मे दरम्यान ९ ठिकाणी शिबिरांचे आयोजन

यावल न्युज 
यावल :  आमदार अमोल जावळे यांच्या सुचने नुसार संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना आणि अन्य सामाजिक लाभाच्या योजनांअंतर्गत लाभार्थ्यांचे डिजीटल पोर्टलवर आधार रजिस्ट्रेशन व व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मोहिम तालुका व मंडळ स्तरावर प्रभावीपणे राबवण्यात येत असून, संबंधित लाभार्थ्यांना आधार पडताळणीसाठी यावल तहसील कार्यालय आणि विविध मंडळ कार्यालयांमध्ये आयोजीत शिबिरांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे.

अशी आहेत शिबीर

१) सावखेडासीम दि ७ बुधवार 
२) भालोद दि ८ गुरुवार 
३) साकळी दिं १३ मंगळवार
४) कीनगाव दि १५ गुरुवार
५) बामणोद दि १९ सोमवार
६) अंजाळे दि २१ बुधवार
७) फैजपुर दि २२ गुरुवार
८) न्हावी प्र यावल दिं २३ शुक्रवार
९) यावल दि २६ सोमवार 

अशी शिबीर यावल तालुक्यात आयोजीत करण्यात आली आहे लाभार्थ्यांना आधार रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड, दोन छायाचित्रे, मोबाईल क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लाभार्थ्यांना आपल्या गावाजवळील ठिकाणी उपस्थित राहता यावे, यासाठी ९ ठिकाणी ७ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.


तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहर व परिसरातील लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रातच उपस्थित राहावे. आधार रजिस्ट्रेशन न झाल्यास लाभ थांबण्याची शक्यता असल्याने, प्रत्येक पात्र लाभार्थ्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार शिबिरात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने