Yawal Road News यावल शहरातील आयशानगर अपघाताचे खड्डे तात्काळ दुरुस्तीची मागणी

यावल न्युज
 यावल शहरातील भुसावळ मार्गावर फालकनगर बस थांब्याजवळील आयशानगर वस्तीच्या वळणावरील रस्त्याच्या मध्यभागी गेल्या तीन महिन्यांपासून दोन मोठे खड्डे उघडे पडले असून, या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषदेकडून काही कारणास्तव हे खड्डे खोदण्यात आले असले तरी अद्याप त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या वळणावर वाहनचालकांना खड्ड्यांचा अचूक अंदाज घेता येत नसल्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचेही निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिक व वाहनधारक यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे नागरिक आणि वाहनचालकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्याची आणि वाहतुकीस सुरक्षित व सुरळीत बनवण्याची मागणी करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने