Chunchale News चुंचाळे फाटा ते बोराळे रस्ता अखेर मोकळा; यावल न्यूजच्या बातमीची दखल

यावल न्यूज

यावल तालुक्यातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर मुख्य महामार्गास जोडणाऱ्या चुंचाळे फाटा ते बोराळे गाव रस्त्यावर दिनांक ६ मे २०२५ रोजी आलेल्या तुफानी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली होती. यामुळे नागरिकांची व वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली होती. या संदर्भात १४ मे रोजी यावल न्यूजने प्रसिद्ध केलेल्या बातमीची अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेतली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल कार्यालयातील शाखा अभियंता श्री. हर्षल कवीश्वर व वरिष्ठ लिपिक श्री. विकास जंजाळे यांच्या पुढाकाराने रस्त्यावर पडलेली झाडे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. यामुळे चुंचाळे, बोराळे, नायगाव, मालोद, आडगाव परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एस.टी. बसेस, मालवाहतूक ट्रक, दुचाकी व पायदळ प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.

श्री. हर्षल कवीश्वर यांनी रस्त्याचे स्वच्छतेनंतरचे फोटो यावल न्यूजच्या प्रतिनिधींना पाठवले असून, कामात झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी दूरध्वनीवरून दिलगिरी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने