Sangvi Education News ज्योती विद्यामंदिर व पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी बु. – दहावीचा निकाल ८५.३३%

यावल न्युज: किरण तायडे
 ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC) चा निकाल ८५.३३% लागला असून, विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे.
या निकालात शाळेची खुशबू विकास चौधरी हिने ९१.६०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. टीना तुळशीराम सरोदे हिने ८५.८०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर जागृत्ती प्रवीण वायकोळे हिला ८५.४०% गुण मिळाले असून तिने तृतीय क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल प्रकाश मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, आर एम भंगाळे पर्यवेक्षक, सी पी फिरके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने