Yawal News बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा ९१.०४% निकाल; ६१ विद्यार्थी यशस्वी

यावल न्युज
यावल येथील बाल संस्कार शिक्षण मंडळ, एज्युकेशन सोसायटी यावल द्वारा संचलित बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२५ मधील दहावीचा निकाल उल्लेखनीय असा लागला असून, एकूण ९१.०४% निकालाची नोंद झाली आहे.
विद्यालयातून ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६१ विद्यार्थी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. यावर्षीच्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी

प्रथम: खुशी सुनिल बारी – ९५.००%

द्वितीय: सोनाली धनंजय उंबरकर – ९३.८०%

तृतीय: योगेश विकास फालक – ९०.६०%


या यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक ए.एम. गर्गे, उपशिक्षक एल.व्ही. चौधरी, एन.ए. बारी, एस.डी. देशमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

शाळेच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने