Sakali News साकळी मंडळात संजय गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन शिबिर यशस्वी

यावल न्युज
तालुक्यातील साकळी येथील संजय गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन (डीबीटी) शिबिर साकळी मंडळात दि १३ रोजी यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरात संजय गांधी शाखेचे नायब तहसीलदार मनोज खारे, सकावत तडवी, मंडळ अधिकारी सचिन जगताप, ग्राम महसूल अधिकारी मधुराज पाटील, महसूल सेवक विशाल राजपूत, विकास सोळंके व इतर कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे आधार पडताळणीची कार्यवाही केली.

या वेळी साकळीचे सरपंच दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

लाभार्थ्यांनी आधार पडताळणीच्या प्रक्रियेस समाधान व्यक्त केले असून, योजनेचे लाभ सुरळीत मिळावेत यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने