यावल न्युज
यावल- मा. मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा अभियान' टप्पा-2 अंतर्गत तसेच व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम तालुकास्तरीय स्पर्धा 2024-25 चा पारितोषिक वितरण सोहळा यावल पंचायत समितीत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांत बळीराम सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून यावलचे तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी बी. के. पवार, गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ चावदस धनके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध शाळांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
उर्वरित व्यवस्थापन गटातील विजेत्या शाळा:
प्रथम क्रमांक: शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, साकळी
द्वितीय क्रमांक: न्यू इंग्लिश स्कूल, भालोद
तृतीय क्रमांक: आदर्श विद्यालय, दहिगाव
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात:
प्रथम क्रमांक: जि.प. मराठी शाळा, शिरसाड
द्वितीय क्रमांक: पी.एम.श्री जि.प. प्राथमिक शाळा, दहिगाव
तृतीय क्रमांक: जि.प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा, किनगाव खुर्द
व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा विजेते (शिक्षक गट):
मराठी भाषा (1ली-2री): जावीद याकूब शेख सर (उर्दू प्राथमिक शाळा, पटेलवाडा यावल)
इंग्रजी भाषा (1ली-2री): कल्पना माळी (जि.प. शाळा, परसाडे)
भाषा (3री-5वी): प्रथम - ज्योती सनेर (पाडळसे), द्वितीय - रविंद्र बोरसे (उंटावद)
गणित: प्रथम - राजेंद्र अटवाल (शिरसाड)
इंग्रजी: प्रथम - धीरज तायडे (दहिगाव)
परिसर अभ्यास: प्रथम - कविता चकोर (डोणगाव), द्वितीय - ज्योती सनेर, तृतीय - दीपक चव्हाण (शिरसाड)
इंग्रजी (6वी-8वी): दीपक बारी (सत्कार विद्यामंदिर, अट्रावल)
विज्ञान: डॉ. नरेंद्र महाले (सरस्वती विद्यामंदिर, यावल) – तालुकास्तर प्रथम, जिल्हास्तर द्वितीय, तसेच राष्ट्रीय व खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित
सामाजिक शास्त्र: अश्विनी कोळी (भारत विद्यालय, न्हावी)
सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हास्तर विजेते: धीरज तायडे, सचिन धालपे, आसिफ तडवी, शिरसाठ सर, जगदीश माळी, मंगेश पाटील, पुष्पा तायडे, कल्पना माळी, सनेर मॅडम, उज्वला सोनार, सोनाली कुलकर्णी, भोळे मॅडम
महिला क्रिकेट संघ विजेते:
कॅप्टन - ज्योत्स्ना केदारे व इतर सदस्य: कल्पना माळी, कविता चकोर, उज्वला सोनार, ज्योती सनेर, मनीषा तडवी, शमीम तडवी, जयश्री पाटील, शितल राणे, मीनल महाजन, प्रिया पवार, रूपाली पाटील, पुष्पा चौधरी, शबाना तडवी, वैशाली झांबरे
शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकारी:
सरोज पाटील, मंगला सपकाळे, आशिक हुसेन मो. खान यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी तर आभार सुरवाडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती यावलच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.