Dahigaon Bibtya News दहीगाव शिवारात बिबट्याचे दर्शन; कुत्रा व बकरी लंपास

यावल न्युज

यावल तालुक्यातील दहीगाव शिवारात २ मे रोजी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून एक कुत्रा व एक बकरी लंपास केली.
जनार्दन महाजन यांच्या शेतात मुक्कामी असलेल्या यादव कुटुंबाच्या मेंढपाळांनी बिबट्याला झाडावरून उतरतानाचे दृश्य पाहिले. काही वेळातच बाळू माळी यांच्या शेताजवळून बकरी नेल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. वनविभागाने घटनास्थळी भेट देत ठसे तपासले असून ते तळसाचे असल्याचा दावा केला आहे. मात्र शेतकऱ्यांनी बिबट्याच पाहिल्याचा पुनरुच्चार केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतमजुरांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वीही डोंगर कठोरा व पाडळसा हिंगोणा या भागात अशा घटना घडल्या आहे. नागरिकांनी तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने