यावल न्युज फिरोज तडवी
कोरपावली येथील डी.एच. जैन विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ४३.९० टक्के लागला असून, एकूण विद्यार्थ्यांपैकी काहींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत पटेल उमर मुकतार याने ७७.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर मुबारक फिरोज तडवी याने ७६.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला तर पटेल अशपाक अरिफ ७५.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच संस्थाचालक यांनी अभिनंदन करत मार्गदर्शनाचे श्रेय दिले आहे.
यंदा राज्य शासनाकडून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. कॉपी आढळलेल्या केंद्रांवरील केंद्रप्रमुख आणि शिक्षक बदलण्यात आले होते. यापुढेही हे अभियान अशाच कडक पद्धतीने राबवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.