Hingona News प्रभात विद्यालय हिंगोण्याचा निकाल 90 टक्के – गुणवंत विद्यार्थ्यांचे यश

यावल न्युज
यावल तालुक्यातील हिंगोणा येथील ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय, हिंगोणा या शाळेचा दहावीचा निकाल यंदा 90 टक्के लागला आहे. शाळेने यंदाही यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाळेतील खिलेश राकेश बढे याने 92.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक, निकिता रमेश राणे हिने 90.80% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर वैभव दगडू भालेराव याने 90% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन रवींद्र हरी पाटील, सेक्रेटरी अशोक फालक, तसेच मुख्याध्यापक मनोहर गाजरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने