Jalgaon Budha purnima news बुद्ध पौर्णिमा निमित्त अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थेचा स्तुत्य उपक्रम

जळगाव – बुद्ध पौर्णिमेच्या शुभप्रसंगी भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थातर्फे प्रबुद्ध बुद्ध विहार, जाणता राजा नगर, जळगाव येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला रवींद्र तायडे (अध्यक्ष, विभागीय नाशिक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट) आणि मिलिंद सोनवणे (युवक जिल्हाध्यक्ष) यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर परिसरातील समाजबांधवांनी सामूहिक बुद्ध वंदना सादर करत अन्नदानास प्रारंभ केला.
या कार्यक्रमाला जाणता राजा नगर, कोल्हेव्हील परिसरातील रहिवासी तसेच मैत्रीय बुद्धविहार, संविधाननगर, सम्राट अशोक ध्यान केंद्र, जिजाऊ नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी भिमानं बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश अडकमोल, सचिव शुभम पारधे, खजिनदार सतीश सोनवणे, उपाध्यक्ष बॉबी निकम, सहसचिव समाधान तायडे, सहखजिनदार आनंद आराक यांच्यासह नितीन खरे, दिनेश साळुंखे, जितेंद्र सुरळके, अरुण पांडव, अजय तायडे, गौतम भालेराव, सुरेश बिऱ्हाळे, विकास भालेराव, अजय सोनवणे, भीमराव हिरोळे, जितेंद्र सोनवणे, विजय तायडे, श्याम पवार, राजू चव्हाण, सुरेश बिराडे, रवींद्र भालेराव, समाधान सोनवणे या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजप्रबोधन व सेवा कार्याचा आदर्श उदाहरण ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने