Hingona News प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे जागतिक डेंगू दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

यावल न्युज
 हिंगोणा येथे जागतिक डेंगू दिन उत्साहात व जनजागृतीपर उपक्रमांसह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनावाने यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती भामरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मलेरिया, डेंगू व चिकनगुनिया या आजारांची माहिती देण्यात आली, तसेच प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून गप्पी माशांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक किशोर खिस्ते, मो. आसिफ मनियार, आरोग्य निरीक्षक अभीजीत पगारे, आरोग्य सेवक सतीश बोरोले तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये डेंगू व इतर साथीच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण झाली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने