Hambardi News हंबर्डी व हिंगोणा येथील १५ वित्त कामाची चौकशी न झाल्याने; १ जूनपासून उपोषणाचा इशारा

यावल न्युज
 यावल तालुक्यातील हंबर्डी गावात 15 वा वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवा कार्यध्यक्ष अशोक तायडे यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देत संबंधित ठेकेदार, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा दिनांक १ जून २०२५ पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

अशोक तायडे यांनी हिंगोणा गावातील १५ वा वित्त आयोग तसेच दलित वस्ती योजनेतून झालेल्या कामांबाबतही शंका उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. रस्ते गटारी नेमक्या झाल्या कुठे हे सुद्धा दिसत नसल्याने संबंधीत कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत, दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सदर प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने