यावल : प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा – नगर परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाल?

यावल न्युज
 यावल येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागातील दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी राजकीय खेळी मानली जात असून, शहरात चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे यावल तालुका अध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकुब तसेच पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे शहर अध्यक्ष उमर अली मोहम्मद कच्छी यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष हाजी शेख हकीम शेख अल्लाउद्दीन खाटीक यांच्याकडे राजीनामा सादर करताना, कौटुंबिक व खाजगी अडचणींचा हवाला दिला आहे.

मात्र, आगामी काळात होणाऱ्या यावल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजीनैतिक हालचाल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पदाधिकारी लवकरच शहरातील एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आपल्या शेकडो समर्थकांसह इतर एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींमुळे प्रहार जनशक्ती पक्षाला यावलमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, येत्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने