यावल: स्कूल बस व दुचाकीचा भीषण अपघात – दोघांचा जागीच मृत्यू

यावल न्युज : फिरोज तडवी

यावल तालुक्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले हे दोघं काकु पुतण्या दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात असताना, कृषी फलोत्पादन केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या स्कूल बस सोबत जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
सदर अपघात सकाळी सुमारे ७:३० वाजेच्या सुमारास झाला. अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकांचा ताबा सुटण्याची शक्यता असून, यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित यावल पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली स्कूल बस अज्ञान वाहन चालका विरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे तपास करीत आहे .


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने